देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांतच सर्वसामान्यांना राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बस तसेच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा फटका बसला आहे. एसटीच्या तिकीट दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन मंडळाने घेतला आहे. या बरोबरच राज्यभरात रिक्षा व टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपये दरवाढ करण्यात आली आहे. तसेच रिक्षा व टॅक्सीच्या तिकीटासंदर्भातील १ फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार आहेत.