व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. त्यात कधी कधी असे व्हिडीओ समोर येतात जे पाहून पायाखालची जमीन सरकते. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावरुन जात असलेल्या एका महिलेसोबत अश्लील वर्तन करण्यात आले.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथून संतापजनक प्रकार समोर आला. भररस्त्यात एका तरुणाने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून तिचा विनयभंग केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बुरखा घातलेली महिला रस्त्याने एकटी चालत असताना अचानक पाठीमागून आलेला एक तरुण तिला मिठी मारतो आणि चुकीच्या पद्धतीने तिच्या छातीलाही स्पर्श करतो. काही सेकंद हा तरुण या महिलेसोबत हे घाणेरडे कृत्य करतो. त्यानंतर महिला मागे वळून पाहूपर्यंत तो पळून जातो. नंतर प्रत्युत्तर म्हणून, महिलेने त्या पुरूषाला शिवीगाळ केली. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.