स्कूल बसने बाईक स्वराला धडकले जागीच मृत्यू ; VIDEO पाहून थरकाप उडेल

School bus rams into biker दैनंदिन जीवनात आपण ज्या रस्त्यांवरून प्रवास करतो, तोच रस्ता कधीकधी जीवघेणा ठरू शकतो, याची दुर्दैवी आठवण तेलंगणामधील मियापूरमध्ये घडलेल्या एका भीषण अपघाताने करून दिली आहे. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा एक थरकाप उडवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून कोणीही हादरून जाईल.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

https://x.com/TelanganaCOPs/status/1951202535982899343

दिवसभर वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर अचानक एक भयानक क्षण येतो. एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं आणि एका कारच्या डॅश कॅमेऱ्यात हे भयावह दृश्य कैद होतं. तेलंगणातील मियापूरमधील चौकात नेमकं काय घडलं, कोण याला जबाबदार आहे, आणि बस चालवणाऱ्या चालकाची चूक काय होती, या सगळ्याचा थरारक खुलासा या व्हिडिओमध्ये झाला आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

https://x.com/TelanganaCOPs/status/1951202535982899343

व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार शांतपणे चौकातून रस्ता पार करताना दिसतो. मात्र, काही क्षणातच अत्यंत वेगाने येणाऱ्या एका शाळेच्या बसने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीस्वार जागेवरच कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मागून येणाऱ्या एका कारच्या डॅश कॅमेरात पूर्णपणे रेकॉर्ड झाली.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

https://x.com/TelanganaCOPs/status/1951202535982899343

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, बस भरधाव वेगात होती आणि चालकाचे नियंत्रण सुटले होते. दुचाकीस्वार रस्ता पार करताना पुरेशी काळजी घेत होता, पण बसचालकाने ब्रेक दाबण्याचा किंवा वेग कमी करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. अपघातानंतर काही क्षणातच सगळं शांत झालं आणि बसचालक मृत व्यक्तीला तिथेच सोडून निघून गेला.

या घटनेनंतर स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. यावर तेलंगणा पोलिसांनी अधिकृतपणे तो व्हिडिओ पोस्ट करत एक महत्त्वाची विनंती केली आहे. “शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या चालकांनी संयमाने वाहन चालवावे. शाळा प्रशासनाने जबाबदार आणि प्रशिक्षित चालकांची नियुक्ती करावी आणि पालकांनीही याकडे लक्ष द्यावे,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे. हा अपघात मियापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment