नमो शेतकरी 6,000 ऐवजी 9,000 रूपये मिळणार
६ हजार ऐवजी ९ हजार मिळणार?
नमो शेतकरी योजना (Namo Shetkari Yojana) ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) धर्तीवर राज्यात सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्याला वर्षाकाठी एकूण ६,००० रुपये मिळतात. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रकमेत वाढ करून ती ९,००० रुपये वार्षिक करण्याची घोषणा केली होती.
नमो शेतकरी 6,000 ऐवजी 9,000 रूपये मिळणार
पिकविमा बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला पैसे आले का? चेक करा Crop Insurance status
पिकविमा बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला पैसे आले का? चेक करा Crop Insurance status
या वाढीव रकमेसाठी सरकारला अतिरिक्त ३,००० कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक आहे. मात्र, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे” सरकारच्या तिजोरीवर वाढलेला ताण हे देखील यामागील एक कारण असू शकते, असे बोलले जात आहे.
नमो शेतकरी 6,000 ऐवजी 9,000 रूपये मिळणार
सातव्या हप्त्यास विलंब आणि नवे नियम
राज्यातील ९३ लाखांहून अधिक शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खत खरेदीसाठी हा हप्ता वेळेत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र निधीच्या तरतुदीमुळे यात अडचण निर्माण झाली आहे.
50 वर्षांपूर्वी 1 तोळा सोन्याची किंमत किती होती? पाहून चकित व्हाल! Gold Price
50 वर्षांपूर्वी 1 तोळा सोन्याची किंमत किती होती? पाहून चकित व्हाल! Gold Price
याचबरोबर या योजनेसाठी ‘ॲग्रीस्टॉक’ (Agristock) शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्याची चर्चा आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी हे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. या धर्तीवर, राज्य सरकारही लवकरच नमो शेतकरी योजनेसाठी अशीच अधिसूचना जारी करू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र काढून ठेवावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.