नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेचा चौथा हप्ता हा लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित केला जाणार आहे. या संदर्भात ऑफिशियल अशी माहिती समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेमार्फत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत मिळतात. हे पैसे प्रत्येकी तीन इंस्टॉलमेंट ( 3 installment ) मध्ये दिले जातात. आणि प्रत्येक इन्स्टॉलमेंट ( installment ) हा 2000 रुपयाचा असतो.
केंद्र सरकारने सुद्धा भारतातील पात्र शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत पैसे पाठवण्याची योजना काढलेली आहे. या योजनेचे नाव आहे ‘ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ‘. पीएम किसान योजना, ही योजना फेब्रुवारी 2019 पासून भारतामध्ये राबवली जाते. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर वार्षिक 6,000 रुपये येतात. हे सुद्धा प्रत्येकी तीन इंस्टॉलमेंट ( 3 installment ) मध्ये येतात. प्रत्येकी इन्स्टॉलमेंट ( Installment ) हा 2,000 रुपयाचा असतो.