land records : जमिनीच्या बाबतीत असलेल्या बऱ्याच बाबी आता ऑनलाईन करण्यात आलेल्या असून या यासंबंधी राज्याच्या महसूल आणि भूमी अभिलेख या दोन्ही विभागांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे .
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर
तुम्ही अगदी सातबारा उतारापासून ते जमिनीची इतर महत्त्वाची कामे काही मिनिटांमध्येच मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने करू शकता. त्यामुळे सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारणे यामध्ये जाणारा वेळ व पैसा यापासून मुक्तता मिळालेली आहे.तसेच आपण जमिनीचा विचार केला तर बरेचदा जमिनीच्या हद्दी ,बांध तसेच रस्ते इत्यादी वरून वाद उद्भवतात त्यामुळे याप्रसंगी जमिनीचा सातबारा तसेच उतारा जितका महत्त्वाचा असतो तितकाच जमिनीचा नकाशा देखील महत्त्वाचा असतो.
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर
त्यामुळे तुम्हाला जमिनीचा नकाशा कुठे मिळेल किंवा कसा काढावा हे माहिती असणे गरजेचे आहे. जमिनीचा नकाशा काढण्यासाठी आता तुम्हाला कुठल्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही . अगदी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर जमिनीचा नकाशा काढू शकणार आहात. त्यामुळे आपण या लेखांमध्ये जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढावा याबद्दलची माहिती घेणार आहोत.आपल्या शेतजमिनीचा नकाशा ऑनलाइन पद्धतीने कसा पाहायचा याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सध्या महाराष्ट्र शासनाने शेतजमिनीचा नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. शेतजमिनीचा नकाशा पाहणे आपल्याला त्या वेळी उपयुक्त ठरते, जेव्हा शेतात जाण्यासाठी रस्ता शोधायचा असतो किंवा आपल्या जमिनीची हद्द ठरवायची असते. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेली माहिती सहज उपलब्ध होते.
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर
ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी प्रथम खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला दुसऱ्यांदा एका नवीन पृष्ठावर नेले जाईल. येथे परत लिंकवर क्लिक करा, त्यामुळे महाराष्ट्र शासनाची अधिकृत महा भूमि अभिलेख वेबसाईट उघडेल. Mp land recordवेबसाईट उघडल्यानंतर, तुमच्या मोबाईलवरील क्रोम ब्राउझरमध्ये डेस्कटॉप मोड सुरू करा. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तीन लाईन्स दिसतील, त्या लाईन्सवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, आणि गाव निवडायचा आहे. प्रत्येक पर्याय निवडताना थोडा वेळ लागेल, कारण ही सरकारी वेबसाईट असल्याने प्रक्रिया थोडी धीम्या गतीने चालते.
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर
सर्व पर्याय निवडल्यानंतर, काही क्षणात तुमच्या गावाचा नकाशा स्क्रीनवर दिसू लागेल. नकाशावर विविध नंबर दर्शविलेले असतात. या नंबरवर क्लिक केल्यास, त्या भागातील शेतकऱ्यांची माहिती, जमिनीची तपशीलवार माहिती, आणि हद्दीचे वर्णन स्क्रीनवर पाहायला मिळेल.या प्रक्रियेचा उपयोग करून शेतजमिनीच्या संदर्भात आवश्यक असलेली सर्व माहिती तुम्ही घरबसल्या मिळवू शकता, आणि ही पद्धत वेळ वाचवणारी तसेच सोयीस्कर ठरते.
1. जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्याकरता सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगलवर जाऊन त्या ठिकाणी https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp असे सर्च करावे लागेल. वेब साईड ओपन होण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो .
2. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होते. तुम्ही पेज ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला तीन रेषा दिसतील त्यावर क्लिक करा .
3.या ओपन झालेल्या नवीन पेजच्या डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन हा एक कॉलम दिसेल. या कॉलम मध्ये तुम्हाला तुमचे राज्य आहे व कॅटेगिरी यामध्ये रुलर आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील . जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला रुलर या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. तसेच तुम्ही जर शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला अर्बन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. त्यानंतर तुमचा जिल्हा तसेच तालुका आणि तुम्ही राहत असलेले गाव निवडायचे आहे. आणि सगळ्यात शेवटी व्हिलेज मॅप यावर क्लिक करणे गरजेचे आहे.
5. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावांमध्ये आहे त्या गावचा संपूर्ण नकाशा तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होतो.
6. त्यानंतर होम या पर्याय समोरील जो काही आडवा बाण आहे त्यावर क्लिक केले की तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहू शकता.
7. त्यानंतर डावीकडे असणाऱ्या अधिक(+) आणि वजा (- ) या बटनावर क्लिक केले की नकाशा मोठा किंवा लहान आकारात तुम्हाला पाहता येतो.
जमिनीचा नकाशा कसा काढावा?
1. डावीकडच्या बाजूला तीन एकाखाली एक डाव्या रेषा तुम्हाला दिसतील त्यावर जर तुम्ही क्लिक केले की तुम्ही पहिल्या पेजवर जाऊ शकता व तिथे गेल्यावर या पेजवर तुम्हाला सर्च प्लॉट नंबर या नावाचा एक कॉलम त्या ठिकाणी दिसेल.
2. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकणे गरजेचे आहे . गट क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या जमिनीचा गट नकाशा त्या ठिकाणी ओपन होतो.
3. त्यानंतर होम या पर्यायासमोरील जो काही आडवा बाण आहे त्यावर क्लिक करून आणि त्यानंतर वजाबाकीचे बटन दाबून तुम्ही संपूर्ण नकाशा पाहू शकता.
4. यानंतर डावीकडे प्लॉट इन्फो या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेत जमीन कोणाच्या नावावर आहे. त्या शेतकऱ्याचे नाव व त्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल.
गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा मोबाईलवर
5. गट क्रमांक मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे. त्याची सविस्तर माहिती तुम्हाला तिथे दिलेली आहे.
6. संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित पाहिल्यानंतर डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी मॅप रिपोर्ट या नावावर क्लिक केल्यावर की तुमच्या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्यासमोर ओपन होतो. त्यानंतर उजवीकडे खाली दिशा असलेल्या पानावर क्लिक केले की तुम्ही तो नकाशा डाऊनलोड करू शकता.
7. त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेत जमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात व खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे. याची सविस्तर माहिती दिलेली असते. अशा पद्धतीने तुम्ही अगदी सहजरीत्या तु