Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट !! या महिलांना मिळणार नाही 1500 रुपये, जून चा हप्ता कधी येईल?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ जमा केला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत.

या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा लाभ हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आहे. यामुळे याचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या 11 महिन्यांचा लाभ जमा करण्यात आला आहे. Ladki Bahin Yojana June month Installment

लाडकी बहीण अपात्र यादी मध्ये आपले नाव चेक