लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार ? ladki bahin 2100 hafta

ladki bahin 2100 hafta मागील वर्षभरात राज्यात चर्चेत असणारी महाराष्ट्र राज्य शासनाची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. जुलै 2024 मध्ये महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचे अंतर्गत महिलांना प्रति महिन्याला 1500 रुपये एवढा निधी वितरित केला जातो.निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू केली ही योजना निवडणुकीमध्ये महायुतीला अत्यंत फायद्याची ठरली. या योजनेचा जोर धरून महायुती सरकारने प्रचारादरम्यान देखील महिलांना पात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केली होती.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार

सरकारने निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणींना रुपये देण्याची आश्वासन दिले होते. सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे आणि सरकार परत सत्तेत आल्यामुळे महिलांना 2100 रुपये कधी मिळतात याची अपेक्षा लागली आहे.

महायुती मधील सर्वच पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणीने 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीरनामा त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या देखील जाहीरनाम्यामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची आश्वासन दिले होते.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार

याच प्रश्नाबाबत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना 2100 रुपये महिलांना कधी मिळणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला? त्यावेळी गिरीश महाजन म्हणाले राज्यात आम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना शासनाने हाती घेतली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपये वाटप केले जात आहेत. निवडणुकीच्या कार्यकाळात आम्ही राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी आश्वासन दिले होते. परंतु माहिती सरकारची सत्ता स्थापन होऊन आणखी एक वर्ष सुद्धा झाले नाही. शासन महिलांना २१ रुपये देण्याबाबत सकारात्मक आहे. सध्या महाराष्ट्र राज्याचे आर्थिक स्थिती अडचणींचा सामना करत आहे. हे सर्वांनाच माहिती देखील आहे. शासनाने लागू केलेली पंधराशे रुपये नियमितपणे महिलांना वाटप केले जात आहेत. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर नक्कीच महिलांना 2100 देण्याबाबतचा निर्णय देखील घेतला जाईल. सध्या राज्यातील लाडक्या बहिणी त्यांना मिळत असलेल्या पंधराशे रुपयावर त्या आमच्यावर अत्यंत खूश आहेत. अशी माहिती गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार

सध्या 2100 नाहीच. ladki bahin 2100 hafta
मागील बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यासोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे असतील यांच्या माध्यमातून सध्यातरी लाडक्या बहिणीने 2100 रुपये देण्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती दिलेली आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर महिलांना नक्कीच 2100 रुपये दिले जातील अशी आश्वासन सर्वांनीच दिलेले आहे. परंतु सध्या तरी राज्यातील लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये एवढाच निधी मिळणार आहे.

ज्या कुटुंबातील महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारनं गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या अंमलबजावणीला मागील वर्षी जुलै महिन्यापासून सुरुवात झाली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या योजनेवरून विरोधकांनी सरकारच्या कोंडीचा प्रयत्न केला. तर आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो तर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.

दरम्यान राज्यात आता महायुतीचं सरकार आलं आहे. मात्र अजूनही 2100 रुपयांबाबत कोणताही निर्णय झालेला नाहीये. लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेंतर्गत 2100 रुपयांची घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अजूनही त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाहीये. यावरून आता विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे.

1500 रुपयांच्या ऐवजी लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा या ठिकाणी झाली होती. ते कधी मिळणार ? अधिवेशनात त्याची घोषणा होणार आहे की नाही? आम्हाला पॉइंटेड उत्तर हवं आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं. रोहित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे, ती महायुतीच्या सरकारनं आणली आहे. महिलांना 1500 रुपयांचा लाभ वितरीत करणारं हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात जो आनंद आहे, तो कायम राहणार आहे. 2100 रुपयांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment