अजगरानं केली कुत्र्याची शिकार; क्षणात गिळून टाकलं, पुढे काय झालं तुम्हीच पाहा, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Giant python swallows pet dog साप आणि अजगर या प्राण्यांची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर सरसरून काटा येतो. मानवी वस्तीमध्ये अनेकदा साप किंवा अजगर आढळतात आणि सोशल मीडियावर त्यांचे अनेक थरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असेच काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला धक्का बसतो. सध्या जंगलातील एका अजगराचा असाच एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तुम्ही आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये, विशेषतः हॉलिवूडपटांमध्ये, एखाद्या महाकाय अजगराने व्यक्तीला किंवा प्राण्याला जिवंत गिळल्याची दृश्ये पाहिली असतील. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अजगराने घरात घुसून क्षणात एका कुत्र्याला गिळले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://x.com/HimachalW/status/1950186090897265038

ही घटना हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यात घडली आहे. रात्री घरातील पाळीव कुत्रा व्हरांड्यातील गोणीवर शांतपणे झोपलेला असताना, एक महाकाय अजगर घरात घुसला आणि त्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याची शिकार केली. सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मालकीण संध्या देवी नातू योगेशसोबत घराच्या व्हरांड्यात झोपल्या होत्या. कुत्री व्हरांड्याच्या एका कोपऱ्यात बाथरूमजवळ बसली होती. अचानक तिथे अजगर आला आणि त्याने कुत्रीला पाहताच तिच्यावर हल्ला केला. आवाज ऐकून संध्या देवी झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांनी पाहिले तर अजगराने त्यांच्या पाळीव कुत्रीला जिवंत गिळले होते. त्यानंतर त्यांनी तात्काळ अलार्म वाजवला आणि शेजाऱ्यांना बोलावले. गावकरी घटनास्थळी पोहोचेपर्यंत अजगराने कुत्रीला पूर्णपणे गिळून टाकले होते. त्यानंतर तातडीने वनरक्षकांना बोलावण्यात आले आणि त्यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले. सुदैवाने, या भयानक घटनेत कोणतीही मानवी हानी झाली नाही.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा जगातील सर्वात लांब आणि तीन सर्वात वजनदार सापांपैकी एक आहे. हा संपूर्ण व्हिडिओ पाहताना तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित. दरम्यान, हा व्हिडिओ @HimachalW या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment