जिल्हा प्रमुख गावे (काही उदाहरणे)
यवतमाळ चिल्ली, सुकली, नागेशवाडी, येवली, वडगाव, रामनगर, कोरेगाव, वरूड
वर्धा वाढोणा खुर्द, पोफळणी, शरद, देवळी, इसापूर, काजळसरा, वाटखेडा
नांदेड करोडी, कालेश्वर, वेलांब, ऊचेंगाव, आडा, रुई, पळसा, बरड शेवाळा
हिंगोली गिरगाव, उंबरी, मालेगाव, धमदारी, देगाव, पळसगाव, गुंज, आहेगाव
परभणी उखलद, बाभळी, पिंगळी, शेंद्रा, टाकळगव्हाण, लोहगाव, साजपूर
बीड वरवंटी, पिंपळा धायगुडा, गिरवली आपटे, गिरवली बामणे, गीता, भारज
लातूर गांजूर, रामेश्वर, दिंडेगाव, कासार जवळा, ढोकी, काटगाव, मांजरी
धाराशिव खट्टेवाडी, नितलि, घुगी, लासोना, सांगवी, कामेगाव, चिखली, महालिंगी
सोलापूर घटणे, पोखरापूर, कलमन, राई, मालेगाव, जवळगा, मसले चौधरी
सांगली घटनांद्रे, तिसंगी, शेटफळे, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ
कोल्हापूर मदुर, अदमापूर, व्हाणगुत्ती, वाघापूर, मडिलगे, कुर, नीपण, दारवाड
सिंधुदुर्ग उदेली, फणसवडे, आंबोली, गेलेले, घारप, तांबूली, बांदा, डेगवे
उत्तर गोवा पत्रादेवी
शेतकऱ्यांचा विरोध आणि आव्हाने काय आहेत?
या महामार्गासाठी भूसंपादनाला काही जिल्ह्यांमध्ये तीव्र विरोध होत आहे. विशेषतः कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या महामार्गामुळे त्यांच्या उपजाऊ जमिनी जातील आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. सरकारने बाजारभावाच्या तिप्पट दराने जमीन खरेदी करण्याचे आश्वासन दिले असले, तरी काही शेतकरी या मोबदल्यावर समाधानी नाहीत.