अर्ज कुठे व कसा करायचा?

तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे.

अर्जाचा नमुना खालच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल. याच फॉरमॅटमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. योजनेसाठीच्या शासन निर्णयात हा फॉरमॅट देण्यात आला आहे. एका साध्या कागदावर लिहून तुम्ही हा अर्ज करू शकता.यात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे.

अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे
लाभार्थीचा जन्माचा दाखला
कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल.)
पालकाचे आधार कार्ड
बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत),
मतदान ओळखपत्र
शाळेचा दाखला
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
अर्ज केल्यानंतर पुढे काय?
अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे.

त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे.

प्रातिनिधिक फोटोफोटो स्रोत,GETTY IMAGES
प्रशासकीय यंत्रणेनं 2 महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे.

एकदा का लाभार्थी निश्चित झाले की शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा केली जाणार आहे.